Arthakranti Suggestion for Transition Phase

  • Withdrawal of 500 & 1000 Rs currency notes completely.
  • To absorb sudden liquidity shortage in economy, special adequate numbered / featured new 500, 1000 & 2000* Rs. currency notes to be introduced in a calculated way.
    (2000 rupees note to be introduced just to control number of pieces and provide adequate value for transaction balancing)
    *These new notes are just a stand-by or stop-gap adjustment and can be demonetized /  withdrawn after a smooth transition from current cash-based, non-transparent system to a well-banked, transparent economy.

जीएसटी व अर्थक्रांती प्रस्तावावर चर्चासत्र

देशात लागू होत असलेल्या जीएसटी कायद्याऐवजी अर्थक्रांती प्रस्ताव लागू झाल्यास देशासमोरील बेरोजगारी, काळा पैसा, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, दहशतवाद हे प्रश्न सुटू शकतात. त्यासाठी अर्थक्रांती प्रस्ताव लागू करण्यासाठी शासनाकडे जनतेतून दबाव निर्माण करण्यासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचचे सचिव प्रशांत देशपांडे (लातूर) यांनी नुकतेच येथे केले.

अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच व सीडीएसएल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेअर बाजार व अर्थक्रांती’ या विषयावर मुंबईमधील दादर येथील ब्राह्मण सेवा मंडळ सभागृहात आयोजित चर्चासत्रात देशपांडे बोलत होते. या वेळी मुंबईचे ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचचे अध्यक्ष विजय दबडगांवकर यांनी केले.

गुंतवणूकदारांनी फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत शेअर ब्रोकरमार्फतच व्यवहार करावेत, असे प्रतिपादन चंद्रशेखर ठाकूर यांनी केले. त्यांनी शेअर बाजार, म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट, ऑनलाईन ट्रेडिंग याविषयी एलसीडी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. तसेच गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी-विक्री व्यवहारांची योग्य माहिती मिळावी व आर्थिक फसवणूक होऊ नये तसेच सर्व भारतीयांना सुखी, समृद्ध जीवन जगता यावे यासाठी अर्थक्रांती प्रस्ताव लागू होणो आवश्यक असल्याने चर्चासत्र आयोजित केल्याचे विजय दबडगांवकर यांनी सांगितले. या वेळी उपस्थित प्रेक्षकांनी अर्थक्रांती व शेअर बाजार याबाबतीत अनेक प्रश्न विचारले व यावर चंद्रशेखर ठाकूर व प्रशांत देशपाडे यांनी उत्तरे देऊन उपस्थित प्रेक्षकांचे समाधान केले. अध्यक्षीय समारोपात पुष्कराज सोमण यांनी अर्थक्रांतीच्या अंमलबजावणीची आवश्यकता प्रतिपादित केली. अभ्युदय बँकेचे राजपूरकर यांनी त्यांच्या बँकेतील डिमॅट खात्याच्या सोयीची माहिती दिली.